‘आता बस झालं छमछम, बार बंद करा’, लेडीज बार बाहेर संतप्त महिलांचा एल्गार

 

ठाणे : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या परिसरात भर वस्तीत एक लेडीज बार आहे. या लेडीज बारचा परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील संतप्त महिलांनी आज (11 जानेवारी) बार मालकाविरोधात एल्गार पुकारत थेट लेडीज बारवर धडक दिली. महिलांच्या आक्रोशामुळे अखेर बार मालकाला नमावं लागलं. बार मालकाने तात्पुरता बारचं शरट बंद केलं. त्यानंतर कोळशेवाडी पोलिसांनी भर वस्तीत चालणाऱ्या लेडीज बारच्या चालकाला समज दिली.

या बारचं नाव सत्यम लेडीज बार असं आहे. माजी नगरसेविका निर्मला रायभोळे यांच्यासह या परिसरातील महिलांनी सत्यम लेडीज बारच्या विरोधात आंदोलन केले. हा लेडीजबार चाळवजा भर वस्तीत आहे.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image