ठाणे : कचरावाहक घंटागाडीमधून डिझेल चोरी केल्याप्रकरणी केडीएमसीच्या एका कंत्राटी घंटागाडी चालकाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एका नागरिकाने डिझेल चोरी करतानाचा व्हिडिओ काढल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या कृत्यात घंटागाडी चालक दत्ताराव शिरामे याच्यासोबत अजून किती लोक सामील आहेत, याचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वी केडीएमसीच्या एका अधिकाऱ्याला एका नागरिकाने एक मोबाईल क्लीप दिली होती. या क्लीमध्ये एक व्यक्ती कचरा वाहक घंटा गाडीमधून डिजेल काढतानाचे दिसून येत होते. केडीएमसी प्रशासनाकडून याची चौकशी सुरु झाली. सदर व्हीडीओ हा आय प्रभागामधील गोलवली परिसराचा होता. डिझेल काढणारा दुसरा कोणी नाही तर घंटागाडीवरील चालक दत्ताराव शिरामे होता.