मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे.

मुंबई : गेल्या आठवड्याभरात राज्यात पावसाळी वातावरण होतं. राज्यातील अनेक (Health Alert In Mumbai) भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र, कालपासून राज्यातील तापमान बदलत आहे. मुंबईत कालपासून कोरडं वातावरण आणि तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळीही वाढली आहे. त्यामुळे मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता पातळी धोकादायक स्तरावर पोहोचली आहे. सध्याचे वातावरण आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्याने भौतिकशास्त्रज्ञ तसेच हवामान तज्ज्ञ प्राध्यापक किरणकुमार जोहरी यांनी मुंबईत ‘हेल्थ अलर्ट’ जारी केला आहे. मुंबईतील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. सध्या मुंबईतील तापमान 33 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. त्यासोबतच हवेची गुणवत्ताही खालावली आहे. आज हवेचा गुणवत्ती निर्देशांक 170 इतका नोंदवला गेला आहे. मुंबईत प्रदूषण वाढल्याने ‘हेल्थ अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.