सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना प्रतिबंधक लसीचं लवकरच वितरण, राज्यात लसीकरण कधी
 पुणे: कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अशात कोरोना लसीमुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीचं वितरण आजपासून सुरु होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळीत किंवा उद्या सकाळी ही लस घेऊन जाणारे कंटेनर बाहेर पडणार असल्याची माहिती मिळतेय.

पुण्यातील लोहगाव विमानतळावर हे कंटेनर पोहोचतील. त्यानंतर पुढील वाहतूक विमानातून होईल. देशातील विविध शहरात विमानातून ही लस पोहोचवण्यात येईल. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये त्यासंदर्भातील हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.