मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे.

 

मुंबई : उत्तर भारतासह राज्यात हुडहुडी वाढलेली असतानाच आज ( 4 डिसेंबर) राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर मुंबई तसेच उपनगरांत तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. 

मुंबई वेधशाळेचे प्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 6 ते 7 जानेवारीदरम्यान पावसाची शक्यता आहे. त्याची चाहुल आज सकाळी मुंबईत लागली . होसाळीकर यांनी सांगितल्याप्रमाणे आज सकाळी राज्याच्या काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. तर मुंबईमध्ये सकाळी काही ठिकाणी हलक्या तसेच रिमझिम स्वरुपाचा पाऊस पाडला. मुंबईत थंडीचे प्रमाणही कमी झाले आहे.