ते गुरुवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारने मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) या प्रवर्गातंर्गत दिलेल्या आरक्षणाचे समर्थन केले. मराठा आरक्षण हे एक मृगजळ आहे. कोणताही कायदा, आयोग, समितीकिंवा अध्यादेश मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही. उलट मराठा आरक्षण लागू होऊ शकत नाही असे अनेक नियम आणि कायदे आजही लागू आहेत, याकडे आनंद दवे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
राजकीय नेते, मराठा संघटनांचे नेते आणि अभ्यासकांना या परिस्थितीची पुरेपूर कल्पना आहे. फक्त ही गोष्ट स्पष्टपणे सांगण्याची हिंमत कोणीही करत नाही, असे दवे यांनी म्हटले.
राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले EWS आरक्षण योग्य आहे. मराठा समाजाला आरक्षणाच्या निकषांत बसवायचेच असेल तर ते फक्त आर्थिक आरक्षणाद्वारे शक्य होईल. क्रीमिलेअर हे आर्थिक आरक्षणाचे पहिले पाऊस असल्याचे आनंद दवे यांनी सांगितले.