मुंबई: युनायटेड किंगडम अर्थात UKमध्ये आढळून आलेल्या कोरोना विषाणूचा नवा अवतार हा अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आपल्यालाही आता जास्त काळजी घ्यावी लागेल, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. कोरोना विषाणूचा नवा अवतार अधिक संसर्गजन्य असला तरी आपण सध्या देत असलेली औषधं आणि निर्माण होत असलेल्या कोरोना लस या त्या विषाणूवर परिणामकारक असल्याचा दावाही आरोग्यमंत्री टोपे यांनी केलाय.