कल्याण : डोंबिवलीत खाडीच्या पाण्यात मधोमध सापडलेल्या दोन चिमुकल्यांचे पितृछत्र शाबूत असल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला. ठाकुर्लीत राहणारे चिमुकल्यांचे वडील सुब्रतो साहू अखेर पोलिसांसमोर आले. लॉकडाऊनमध्ये गेलेली नोकरी, आर्थिक चणचण आणि पती-पत्नीतील वाद यामुळे चिमुकल्यांवर ही दुर्दैवी वेळ आल्याचं चित्र आहे. सहा महिन्यांच्या बाळासह दोन वर्षांचा चिमुरडा खाडीजवळ सापडल्यानंतर काल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.
चिमुकल्यांच्या वडिलांचा शोध लागल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. मात्र त्यांची आई अद्यापही बेपत्ता आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली. त्यानंतर आर्थिक तंगीमुळे आमच्यात थोडे-फार वाद होते, मात्र पत्नी रत्नमाला साहू टोकाचे पाऊल उचलेल, असे वाटत नसल्याचं सुब्रतो साहू सांगतात.