ठाणे: मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेवरून केंद्र सरकार आणि ठाकरे सरकार यांच्यात वाद सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन (Bullet Train) प्रकल्पाला चाप लावण्याचे संकेत दिले होते. याचे प्रत्यंतर आता ठाण्यात येताना दिसत आहे.
शिवसेनेने ठाण्यातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या मार्गाला विरोध केला आहे. ठाणे महानगरपालिकेत बुलेट ट्रेनविरोधात ठराव मंजूर करण्यात आला. ठाणे महानगरपालिकेच्या बुधवारी झालेल्या ऑनलाईन सभेत शीळ- डायघर व इतर गावातून जाणाऱ्या बुलेट ट्रेनच्या जागेचा प्रस्ताव सर्वपक्षीयांनी नामंजूर केल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.