ठाणे : गुन्हेगारी विश्वासी संबंधित असलेल्या मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटासारख्याच काही गोष्टी कल्याणमध्ये वास्तवात घडताना दिसत आहेत. एका व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे चक्क फटाके फोडून स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्या समर्थक तरुणांकडून मोठा जल्लोष करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या जल्लोषात फरार आरोपीचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे, हे दिसून येत आहे