८ डिसेंबर ला शेतकऱ्यांच्या वतीने भारत बंद ची हाक, कॉंग्रेस सह इतर पक्षांचा बंद ला पाठींबा

 

नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. त्यावर काँग्रेसनं आज अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या भारत बंदला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये काँग्रेसही सहभागी होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी दिली आहे. काँग्रेसबरोबरच टीआरएस आणि आम आदमी पक्षानंही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे.