नवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी एकत्र आलेल्या शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणीच्या पक्षांचं वर्षभरात चांगलंच गूळपीठ जमल्याचं पाहायला मिळालं. ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त तिन्ही पक्षांनी पाचच नव्हे, तर पंचवीस वर्ष सत्तेत एकत्र राहण्याचा मानस बोलून दाखवला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय स्तरावरही अशाच प्रकारे विरोधी पक्षांशी मोट बांधली जावी, यासाठी काँग्रेसने गळ घातली आहे. विशेष म्हणजे शरद पवारांना पंतप्रधानपदाचा उमेदवार करण्याचीही त्यांची तयारी आहे.