राज्यात थंडीचा कडाका वाढला, मुंबईत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद

 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. दिवाळीनंतर गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तापमानात घट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर यांसह इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तापमानाचा पारा हा 10 अंशावर घसरला आहे. त्यामुळे पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. तसेच थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.