विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.



 मुंबई: विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीची सरशी झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. मतदारांनी पदवीधरच्या 6 पैकी 4 जागांचं दान आघाडीच्या पदरात पाडल्यानं भाजपला सपशेल नाकारल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे भाजपचं ऑपरेशन कमळ बारगळणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. तर, आपलीच सत्ता येईल… हे सरकार त्यांच्या अंतर्गत कलहामुळे कोसळेल… अशा वल्गना करणाऱ्या भाजपासमोर आता इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाच थोपवून धरण्याचं आव्हान उभं राहिल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे.