ठाणे (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञनतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे.शनिवारी या उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशाने शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव,ब्लॉक अध्यक्ष तुळशीराम म्हात्रे यांच्या पुढाकाराने माजिवडा, बाळकूम,ढोकाळी,पेढीवर काम कारणाऱ्या सुमारे १०० सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ठाणे शहरात कोरोनावर अटकाव घालण्यात सफाई कामगारांचा मोलाचा वाटा आहे. मात्र, तळागाळातील या वर्गाचा सन्मान कोणीही केला नसल्याने डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ठामपाच्या सेवेतील सफाई कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव,ब्लॉक अध्यक्ष तुळशीराम म्हात्रे यांच्या पुढाकाराने माजिवडा, बाळकूम,ढोकाळी,पेढीवर काम कारणाऱ्या सुमारे १०० सफाई कामगारांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन ‘कोविड योद्धा’म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी सरचिटणीस रवींद्र पालव,ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव तुळशीराम म्हात्रे,ठाणे विधानसभा अध्यक्ष ऍड विनोद उतेकर,ठाणे विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार,ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे,राजू चापले,चेतन म्हात्रे,सिध्देश म्हात्रे,अभिषेक पाटील,कुंदन म्हात्रे,केदार म्हात्रे,हरीश कुल्लूर,हर्षल म्हात्रे,प्रतीक पाटील,प्रणील बल्लन,यज्ञेश पाटील,विजय भाबरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते .