ॲमेझॉनला किंमत मोजावी लागेल, राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक

 


मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉनमध्ये (Amazon) पेटलेला वाद चिघळण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना दिंडोशी कोर्टाने नोटीस बजावल्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. ॲमेझॉनला येत्या काळात नक्कीच याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा मनसे नेते अखिल चित्रे (Akhil Chitre) यांनी दिला. ॲमेझॉनला महाराष्ट्रात मराठी मान्य नसेल, तर आम्हाला महाराष्ट्रात ॲमेझॉन मान्य नाही, अशी स्पष्ट भूमिका मनसेने घेतली आहे.