ठाणे : ठाणेकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) 1100 मिमी व्यासाच्या जलवाहिनीवरील मेट्रो कामांतर्गत हरदासनगर इथं व्हॉल्व स्थलांतरीत करणं तसंच साकेत ब्रिजखाली मुख्य वाहिनीवरील क्रॉस कनेक्शचा व्हॉल्व बदली करण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. महानगरपालिकेचा स्वत:चा पाणी पुरवठा आणि स्टेम प्राधिकरण यांच्यामार्फत शहरास होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक 04 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 ते शनिवार 05 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तास बंद ठेवण्यात येणार आहे.