मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत अजून वाढ होण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रताप सरनाईकांवर अजून एक गंभीर आरोप केलाय. प्रताप सरनाईक यांनी ठाण्यातील विहंग गार्डन मधील बी 1 आणि बी 2 इमारतीत राहणाऱ्या लोकांची फसवणूक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी सोमय्या यांनी केलीय.
ठाण्यातील विहंग गार्डन मधील बी 1 आणि बी 2 इमारतींना अद्याप वापर परवाना मिळालेला नाही. तसंच इथे अनेक मजल्यांचं काम अनिधिकृतरित्या करण्यात आलं आहे. 2008 पासून या इमारतीमध्ये राहण्यासाठी आलेल्या मध्यमवर्गीयांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे ज्यांची फसवणूक होणार आहे त्यांना नुकसान भरपाई कोण देणार? प्रताप सरनाईकांवर कारवाई होणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.