शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या 'ग्लोबल टीचर' या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

 

सोलापूर : जिल्ह्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या ‘ग्लोबल टीचर’ या पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. 7 कोटी रकमेचा हा पुरस्कार युनेस्को आणि वर्की यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणार आहे.