मुंबई: मराठी भाषेचा वापर करण्यासाठी मनसेनं अॅमेझॉनविरोधात मोहीम उघडली आहे. या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांना काहीसा धक्का सलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबरला अॅमेझॉनच्या कार्यालयावर तोडफोड केली होती. त्याबाबत गुन्हा दाखल करुन पोलिसांनी आरोपींना अंधेरी कोर्टात हजर केलं. तेव्हा अंधेरी कोर्टानं मनसे कार्यकर्त्यांना 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अॅमेझॉनने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना न्यायालयात खेचल्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मुंबईच्या चांदिवली परिसरात असणाऱ्या अॅमेझॉनच्या गोदामाला मनसैनिकांनी लक्ष केलं होतं. अॅमेझॉनच्या वकिलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी चांदीवलीतील साकीविहार मधल्या मारवे रोडवरील अॅमेझॉनच्या कार्यालयात जात तोडफोड केली.