मुंबई : रिपब्लिक टीव्हीच्या अर्णव गोस्वामीला आज रायगड पोलिसांनी अटक केली. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहोचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्णव गोस्वामींना अटक करण्यात आली.
2018 सालात अलिबाग येथील इंटिरिअर डिझायनरने आत्महत्या केली होती, त्या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास अलिबाग पोलिसांकडून काढून रायगड जिल्हा पोलिसांच्या लोकल क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. या तपासाबाबत रायगड पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे. यापूर्वी अर्णव गोस्वामी यांची चौकशी झाली होती, पण कारवाई झाली नव्हती. कलम 306 आणि 34 अंतर्गत अन्वय गोस्वामीला अटक करण्यात आली. अर्णव गोस्वामींनी आपल्याला मारहाण झाल्याचा दावा कोर्टात केला, कोर्टाने पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचं सांगितलं आहे, त्याबाबतचा रिपोर्ट आल्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास कोर्टात सुनावणी होईल.