मुंबई : यावेळी मुंबई महापालिकेवर भगवा फडकविण्याची भाषा करणाऱ्या भाजपवरही त्यांनी टीकास्त्र सोडलं. तुमचा आणि आमचा भगवा काय वेगळा आहे का? असा सवाल करतानाच भगवा फडकवायचाच असेल तर बेळगाव, काश्मीर आणि लाहोरमध्ये फडवा, असं आव्हानच राऊत यांनी भाजपला दिलं. बेळगाव पालिकेवरून भगवा खाली उतरला तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? देशात बऱ्याच जागा आहेत, तिथे भगवा फडकवा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, असं सांगतानाच हा संघर्षाचा भगवा आहे. शिवाजी महाराजांचा भगवा आहे. ज्यांनी ज्यांनी भगव्याला हात लावला ते महाराष्ट्रातून नष्ट झाल्याचा इतिहास आहे, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.
भगवा लाहोरला फडकवा : राऊत