नाशकात गॅरेज मालकाचा खून, पाच तासात पोलिसांनी मारेकऱ्याला पकडलं


नाशिक : नाशकात गॅरेज मालकाच्या डोक्यात पाना घालून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती (Nashik Garage Owner Murder). नाशिक पोलिसांनी अवघ्या पाच तासात या हत्येचा छडा लावत एकाला अटक केली. ही व्यक्ती गॅरेजमध्ये काम करणारा कारागीर होता. मालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून या कारागिराने मालकाची हत्या केल्याचं समोर आलं आहे.


नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाचा पाच तासात पोलिसांनी छडा लावला. कारागिरानेच किरकोळ वादातून मालकाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. गॅरेज मालक रामचंद्र निषाद यांची डोक्यात लोखंडी पाना घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इंदिरानगर पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते.


निषाद यांच्याकडे काम करणारा कारागीर रोशन कोटकर याच्यावर पोलिसांचा संशय होता. कारण, रोशनचे मालक रामचंद्र निषाद यांच्यासोबत काही किकोळ कारणावरुन वादही झालेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता.


पोलिसांनी लागलीच कोटकर आणि त्याचा साथीदार महेश लभडे याला येवला येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image