मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी: मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त करा


मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली. मराठा आरक्षण उपसमितीचा मराठा समाजाला काहीही उपयोग झालेला नाही. त्यामुळे ही समिती बरखास्त करून नव्या सदस्यांचा समितीत समावेश करावा. काम करणाऱ्यांनाच समितीत संधी देण्यात यावी, अशी मागणी आबा पाटील यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार गंभीर नाही. कोणत्याही मागणीवर आणि विषयावर सरकार गंभीर नाही. मुळात भूमिका घेण्यातच सरकार अपयशी ठरलं आहे, असा आरोपही त्यांनी केला.