मनसेने पुन्हा एकदा मंदिराच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला घेरलं आहे.


बाळा नांदगावकर यांनी ट्विट करून राज्य सरकारवर मंदिराच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे. पुनश्च हरी ओम म्हणता अन् हरीलाच कोंडून ठेवता?, असा सवाल नांदगावकर यांनी केला आहे. राज्यात बार उघडले. बारची वेळही ठरवून दिली. आता जलतरण तलाव, मल्टिप्लेक्सलाही परवानगी दिली. कोरोना काय फक्त मंदिरातच होतो काय? काय तर्क असावा या मागे हे कोडेच आहे. हा केवळ भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरावर अवलंबून असणाऱ्या हजारो व्यावसायिकांच्या रोजीरोटीचाही प्रश्न आहे, असं नांदगावकरांनी म्हटलं आहे.