नवी दिल्ली: वाढीव वीजबिलाच्या माफिवरून पक्षांवर निशाणा साधला आहे. ऊर्जा विभागातील थकबाकीला भाजप सरकारच जबाबदार असल्याचं सांगून कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजपचं आंदोलन होत आहे?, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेला लगावला आहे.
‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला. मागील सरकारच ऊर्जा विभागातील थकबाकीला जबाबदार आहे. परंतु, आम्ही केवळ आरोप करणाऱ्यांपैकी नाही. थकबाकी वसूल झाली तर जनतेला नक्की दिलासा देऊ, असं सांगतानाच कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून भाजप आंदोलनाची भाषा करत आहे, असा चिमटा त्यांनी काढला.