लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले.
मुंबई : सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण लोकांनी वीज वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. (No electricity bills will be waived Said Nitin Raut). सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.