सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी : प्लॅस्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा


मुंबई : “पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, कृपया मोठे आवाज करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पद्धतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देतील” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.




कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने परिपत्रक जारी करुन नागरिकांना दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.


फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.