मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ इमारतीला आग


मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध क्रॉफर्ड मार्केट परिसरात (Fire At Crawford Market) आज पहाटे पाचच्या सुमारास एका दुकानाला भीषण आग लागली. आग प्रचंड भीषण होती. त्यामुळे या आगीत आजूबाजूची चार दुकानं जळून खाक झाली. आगीमुळे धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरल्याने दुकानदार आणि स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग नियंत्रणात आणली असून या परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरू आहे. आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.


क्रॉफर्ड मार्केटमधील अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे चौथ्या मजल्यावर ही आग लागली होती. ही आग एल-टू लेव्हलची असल्याची माहिती आहे. मात्र, सध्या अग्निशमन दलाच्या जवानांना या आगीवर नियंत्रण मिळवण्यात पूर्णपणे यश आलं आहे.




क्रॉफर्ड मार्केट येथील 31, 32 अब्दुल रेहमान स्ट्रीट या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत मेडिसीन, स्टॉकची चार दुकांनं जळून खाक झाल्याची माहिती आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती आहे. तसेच, या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पॅकिंग मटेरिअल आणि प्लास्टिकचं सामान असल्यामुळे आग पसरल्याचं सांगण्यात येत आहे.


दिलासादायक म्हणजे अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर वेळेत नियंत्रण मिळवलं त्यामुळे मोठी हानी टळली. तसेच, या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील सर्व नागरिकांनी सुखरुप बाहेर काढण्यात जवानांनी यश आलं.


त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. सध्या अग्निशमन दलाचे जवान कुलिंग ऑपरेशन राबवत आहे.




Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image