मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे आज (11 नोव्हेंबर) कोळी बांधव, बँडवाले आणि वारकरी आपल्या विविध मागण्या घेऊन कृष्णकुंजवर जाणार आहे. यावेळी ते राज ठाकरेंसमोर मागण्यांचं गाऱ्हाण मांडणार आहे.
नुकतंच मुंबईतील कोळी बांधवांनी राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसमोर विविध मागण्यांचं गाऱ्हाण मांडलं. या मागण्या ऐकल्यानंतर राज ठाकरेंनी मी सरकारशी याबाबत बोलेन असे आश्वासन दिले.
त्यावेळी वारकरी संप्रदायाकडून सामाजिक भान राखत वारी करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक अतंर्गत कार्तिक वारीला परवानगी द्यावी, अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. याच मागणीसाठी वारकऱ्यांचं शिष्टमंडळ राज ठाकरेंची भेट घेणार आहे.
त्याशिवाय बँड, घोडे, रथ आणि लग्नसमारंभासंबंधी इतर व्यवसाय सुरु करावा, या मागणीसाठी मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. यावेळी त्यांच्या शिष्टमंडळाकडून हा व्यवसाय सुरु करा, या मागणीसह इतरही मागणी केली जाणार आहे.