मुंबई महानगरपालिकेवर भाजपचाच झेंडा फडकणार : प्रवीण दरेकर

"आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक भाजपा ताकदीने लढणार आहे. या वेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल" असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.



मुंबई : “आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक (Mumbai Municipal Corporation elections) भाजप ताकदीने लढणार आहे. या वेळी महापालिकेवर भाजपचाच झेंडा फडकेल” असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.


“बिहार निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाले. जे एक्झिट पोल सांगितले जात होते. त्याचे तीन-तेरा वाजले. भाजपला सायलेंट व्होटर्सनी भरभरुन मत दिलं. यावेळची मुंबई महापालिका निवडणूक भाजप पूर्ण ताकदीने लढणार आहे. मुंबई मनपावर यावेळी भाजपचाच झेंडा फडकणार” असं प्रवीण दरेकर म्हणाले.