चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर मिळाले, आर्थिक अडचण असताना पोलिसांची मोठी कामगिरी


ठाणे : चोरी गेलेल्या वस्तू शक्यतो परत मिळत नाहीत हे आपण सगळ्यांनी अनुभवलं आहे. अशात सोन्या-चांदीच्या वस्तू तर मिळणं कठीण असतं. पण चोरी गेल्याच्या तब्बल 8 वर्षांनंतर दागिने पुन्हा मिळाले तर? तुम्हाला विश्नास नाही बसणार पण आर्थिक परिस्थिती हालाखीची असताना चोरीस गेलेले दागिने आठ वर्षानंतर पोलिसांनी मिळवून दिले आहेत. 


दिवा इथं राहणारा संदीप घाग हा तरुण 2012 साली कामानिमित्त कल्याणला आला होता. रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना काही चोरट्याने त्याला हटकले. त्याच्या जवळील असलेल्या दागिने घेऊन चोरटे पसार झाले. पोलिसांनी तपासात संदीपला लुटणारे चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून संदीपचे चोरी गेलेले दागिने हस्तगत केले.


संदीप घाग यांची लॉकडाउनमुळे नोकरी गेली. आई आजारी आहे. घराची आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे. या परिस्थितीत त्यांच्याकडे काही पैसे नाही. तो आर्थिक विवंचनेत असताना त्याला एक फोन आला. तो फोन कल्याण जीआरपी पोलिसांचा होता.सं दीपला सांगितले तुमचे गेलेले दागिने सापडले आहेत. तुम्ही घेऊन जा. हे ऐकुन संदीपला आश्चर्य वाटले. कारण, या घटनेला आठ वर्ष उलटून गेली आहेत.


यावेळी पोलिसांच्या हस्ते त्यांचे 70 हजार रुपये किमतीचे दागिने त्याला परत करण्यात आले. ज्याच्याकडे पैसे नाही त्याच्यासाठी हा मोठा आधार आहे . संदीप घाग यांनी मनापासून पोलिसांचे आभार मानले आहेत.