मुंबई महापालिकेतील सीसीटिव्ही बंद, नव्या सीसीटिव्हीसाठी 77 लाखांचा खर्च


मुंबई : मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक अशा मुख्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. हे सीसीटीव्ही बंद पडल्याने पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. हे नव्याने सीसीटिव्ही लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केला आहे. यासाठी मुंबई महापालिका 77 लाख रुपये खर्च करणार आहे. 


भारतावर इंग्रजांचे राज्य असताना मुंबई महापालिका मुख्यालयाची इमारत बांधण्यात आले आहे. या इमारतीला ऐतिहासिक असे महत्त्व आहे. या इमारतीत महापौर, आयुक्त, विविध समित्यांचे अध्यक्ष, पक्षांची कार्यालये असल्याने या इमारतीत अनेक बड्या नेत्यांची लोकांची ये-जा असते.




मुंबईवर पाकिस्तानी आतंकवादी कसाबने हल्ला केला. तेव्हा पालिकेचा एक सुरक्षारक्षक जखमी झाला होता. मुंबई महापालिका मुख्यालय नेहमीच हिट लिस्टवर राहिले आहे. अशा या मुख्यालयात सुरक्षेच्या कारणासाठी 2016 मध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत.


मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद पडले आहेत. याचे कंत्राटही संपले आहे. यामुळे या सीसीटीव्हीची देखभाल कंत्राटदाराने बंद केली आहे.


पालिका मुख्यालय हिट लिस्टवर असल्याने पालिका मुख्यालयात नव्याने 84 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी कंत्राटदाराला नव्याने कंत्राट देण्यात येणार आहे. यासाठी 77 लाख 55 हजार 514 रुपये खर्च करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या बुधवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.




Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image