ठाणे : पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांनी महाराष्ट्र सरकारला आपला जाहीर पाठिंबा असल्याचे दिले पत्र.कर्नाटक आमची जन्मभूमी असली तरी महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे. कर्नाटकात मराठी भाषिकांवर चाललेल्या दडपशाही बाबत या हॉटेल व्यवसायिकांनी कर्नाटक सरकारचा निषेध व्यक्त केला व आम्ही महाराष्ट्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत अशा भावना याप्रसंगी व्यक्त केल्या.
कर्नाटक आमची जन्मभूमी असली तरी महाराष्ट्र आमची कर्मभूमी आहे.