मुंबई : दरम्यान, रामदास आठवले आज दुपारी 2 वाजता चैत्यभूमी येथे जाऊन महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत. सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय म्हणजे राज्य सरकारला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टीका रामदास आठवले यांनी यापूर्वी केली होती. मात्र, मंदिरं उघडण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो, असंही आठवले म्हणाले आहेत.