‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेसमोर नवे संकट


मुंबई : अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ने ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. पौराणिक मालिकेच्या या कथानकावर आता ज्योतिबा ग्रामस्थांनी आक्षेप (objection) घेतला आहे. या मालिकेत चुकीच्या पद्धतीने इतिहास दाखवला जात असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामस्थांच्या आक्षेपामुळे आता निर्मात्यांच्या समोर नवे संकट उभे राहिले आहे.