भारतात कोरोना एक्टिव रुग्णांची संख्या घटली, 24 तासात 74 हजार जण कोरोनामुक्त

देशात कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट होऊन आता ही संख्या सात लाखांपेक्षा कमी झाली आहे. काल दिवसभरात 73 हजार 979 रुग्ण बरे होऊन घरी परतले.



आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासात 54 हजार 366 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 690 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर दिवसभरात 73 हजार 979 रुग्ण बरे होऊन घरी परतले. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 77 लाख 61 हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्यापैकी एक लाख 17 हजार 306 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 69 लाख 49 हजार जण आतापर्यंत बरे झाले आहे. शिवाय अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 6 लाख 95 हजारांवर आली आहे. कोरोनाबाधित अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या नऊ पट आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये कोरोना व्हायरसचे अॅक्टिव रुग्ण, मृत्यू दर आणि रिकव्हरी रेटची टक्केवारी सर्वाधिक आहे. ICMR च्या माहितीनुसार, 22 ऑक्टोबरपर्यंत कोरोना व्हायरसचे एकूल 10 कोटी नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 14 लाख नमुन्यांची तपासणी काल झाली आहे. पॉझिटिव्हिटी रेट चार टक्क्यांपेक्षा कमी आहे.