तर आम्ही ढोल वाजवून स्वागत करू: नांदगावकर

मनसेने पुन्हा एकदा मंदिर उघडण्याची आणि रेल्वे सुरू करण्याची मागणी केली आहेच. रेल्वे सुरू करा, मंदिरे उघडा. हवं तर त्याचं श्रेय तुम्हीच घ्या. तुमचं अभिनंदन करून हवं तर आम्ही ढोल वाजवू, पण हे कराच, अशी मागणी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केली आहे.



कल्याण : कल्याण येथे आले असता बाळा नांदगावकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सर्व ठिकाणी मंदिर उघडली गेली आहे, त्यामुळे राज्यातही रेल्वे सुरू करण्यात यावी. तसेच मंदिरेही लवकरात लवकर उघडली पाहिजे. लोकांसाठी ते आवश्यक आहे. लोकांच्या भावनांचा सन्मान राखणे हे सरकारचं काम आहे. सरकारने ते केले पाहिजे. श्रेय तुम्ही घ्या, आम्ही तुमचं अभिनंदन करू, हवं तर ढोलही वाजवू, असा टोला नांदगावकर यांनी लगावला.


यावेळी त्यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरूनही सरकारला घेरले. केंद्र सरकारकडून जीएसटीची किती थकीत रक्कम येणे बाकी आहे. मुख्यमंत्री सांगतात 38 हजार कोटी येणे बाकी आहे, तर बाळासाहेब थोरात सांगतात 30 हजार कोटी येणे बाकी आहे. तर कोण म्हणतं 60 हजार कोटी बाकी आहेत. त्यामुळे आम्ही संभ्रमात आहोत. कारण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री वेगवेगळे आकडे सांगत आहेत. त्यांनी एकत्र येऊन ठरवले पाहिजे. किती पैसे येणार आहे, असा टोला बाळा नांदगावकर यांनी राज्य सरकारला लगावला आहे.


अंबरनाथ येथे मनसे पदाधिकारी राकेश पाटील यांची हत्या झाल्याच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांनी शुक्रवारी कल्याणचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रेय कराळे यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील आणि माजी आमदार प्रकाश भोईर उपस्थित होते. राकेश पाटील हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधारला लवकरात लवकर अटक करावी तसेच उल्हासनगरमधील मनसे पदाधिकारी मनोज शेलार यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना अटक करा, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या. (mns leader bala nandgaonkar on restart railway service)


 




 


Popular posts
महाराष्ट्र पोलिसांच्या सहकार्याने नकली उत्पादनाच्या विक्रीचा पर्दाफाश : पालघर आणि भिवंडीत संयुक्त छापे
Image
वंचित बहुजन आघाडीला सुरुंग : शेकडो गटई कामगारांसह कार्यकर्त्यांचा रिपाइं एकतावादीमध्ये प्रवेश
Image
कल्याणी महीला बहुउदेशिय सेवाभावी संस्थेच्या अंबरनाथ शाखेचा उद्घाटन सोहळा संपन्न...!
Image
ठाण्यात महिलांसाठी ‘मासिक पाळीची खोली’, या असतील खास सुविधा
Image
पेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचे युवक भाजप कार्यालयावर काढणार सायकल मोर्चा : एकहजार सायकल स्वार ठाणे ते मुंबई प्रवास करणार
Image