महापालिका आयुक्तांनी केली भायंदरपाडा, होरायझन स्कूलची पाहणी
ठाणे
महापालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी भायंदरपाडा येथील क्वारंटाईन सेंटर तसेच होरायझन स्कूल येथील असिमटोमॅटीक कोवीड हॉस्पीटला भेट दिली. २ जुलै रोजी दुपारी पालिका आयुक्त डॉ शर्मा यांनी महापालिका अधिका-यांसह भायंदरपाडा येथे महापालिकेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या क्वारंटाईन सेंटरची पाहणी केली. यावेळी त्यांनी तेथील डाॅक्टर्सची संवाद साधला. तसेच त्या ठिकाणी देण्यात येणारे भोजन व इतर सुविधांची माहिती घेतली. त्येथील रूग्णांना प्रोटोकॉलप्रमाणे औषधोपचार करण्यात येतात का याची माहिती घेतली.
सदर क्वारंटाईन सेंटरला भेट दिल्यानंतर महापालिका आयुक्तांनी येथे पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करून हे क्वारंटाईन सेंटर राज्यात आदर्श क्वारंटाईन सेंटर असू शकते असे सांगितले. त्यानंतर त्यांनी न्यू होरायझन स्कूल येथील असिमटोमॅटीक हॉस्पीटलला भेट दिली. या ठिकाणीही त्यांनी डाॅक्टरांशी संवाद याधून कशा पद्धतीने रूग्णांवर उपचार केले जातात याची माहिती घेतली. तसेच साफसफाई योग्य पद्धतीने केली जाते की नाही याची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, डॉ राजीव कोर्डे आदी उपस्थित होते.