ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन

 ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन



ठाणे


ठाण्यात १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. ठाण्यातील कोरोना रूग्णांची संख्या अजूनही कमी होत नसल्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २ ते १२ जुलै लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आता तो १९ जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आला आहे.  साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ च्या कलम २ अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ च्या सर्व संबंधित तरतुदींसह प्राप्त अधिकारांचा वापर करुन, आयुक्त ठाणे महानगरपालिका, हे दि. १२/०७/२०२० रोजी सकाळी ७.०० वाजेपासून ते दि.१९/०७/२०२० रोजी सांयकाळी ५.०० वाजेपर्यंत संपूर्ण ठाणे महानगरपालिका हद्दीत लॉकडाऊन जाहीर करत आहेत  या कालावधीत विहित केलेले नियम व उपाययोजना यांची अंमलबजावणी केली जाईल. यामध्ये केवळ घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा असेल. या व्यतिरिक्त बाकीच्या अटी व नियम पूर्वीप्रमाणेच लागू रहातील. असे आदेश आयुक्तांनी पारित केले आहेत.