ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचा घरपोच रेशनचा अनोखा उपक्रम

ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेतेच लोकांना फळं, भाजी आणि सर्व प्रकारचे अन्नधान्य घरपोच देणार आहेत.


ठाणे


सध्या कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नागरिकांना बाहेर पडता येत नाही. त्यामुळे ग्रीनफिल्ड अॅग्रो सर्व्हीसेस आणि ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्या माध्यमातून आता ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेतेच लोकांना फळं, भाजी आणि सर्व प्रकारचे अन्नधान्य घरपोच देणार आहेत.  सध्या ठाण्यात दहा वृत्तपत्र विक्रेते अशी सेवा देत असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या घरात लागणाऱ्या बहुतेक सर्व वस्तू वृत्तपत्र विक्रेता आपल्याला घरपोच आणून देईल. त्यासाठी लोकांना ग्रीनफिल्ड अॅग्रो सर्व्हीसेसचे ॲप प्ले स्टोअरवर जाऊन डाऊनलोड करावे लागणार आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून लोकांनी ऑर्डर दिली की पुढच्या दोन दिवसात आपला वृत्तपत्र विक्रेता ही ऑर्डर आपल्याला घरपोच आणून देणार आहे. आता वृत्तपत्र विक्रेत्यांना लोकांच्याही सहकार्याची अपेक्षा असल्याचं ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी सांगितले.