अखंडित वीज पुरवठ्यासाठी खारेगाव भागात देखभाल दुरुस्तीचे काम सुरु
अखंडित वीज पुरवठ्यासाठी खारेगाव भागात देखभाल दुरुस्तीचे काम सुरु

 

ठाणे

 

गेल्या काही आठवड्यांपासून खारेगाव आणि पारसिक नगर परिसरामधून वीजपुरवठा खंडित होण्याच्या अनेक तक्रारी अद्यापही सुरु आहेत. तसेच या क्षेत्रातील वीज नेटवर्पचे काही कमकुवत ठिकाणे होती आणि नेटवर्प देखभाल / दुरुस्ती आवश्यक होती. परंतु टेकओव्हर नंतर कोविड लॉकडाऊन लागू झाल्यामुळे मुळात कंपनीने बनविलेले उपक्रम शक्य झाले नाही वा आवश्यक तसे देखभाल कार्य करता आले नाही.  ग्राहकांच्या या तक्रारींची दखल घेणे आणि काही ओळखल्या गेलेल्या कमकुवत नेटवर्प पॉईंट्सवर कायमस्वरूपी तोडगा काढणे यासाठी टॉरेंट पॉवरने शनिवारी खारेगाव आणि पारसिक नगर परिसरासाठी देखभाल दुरुस्तीची मोठी योजना आखली. परिसरातील ग्राहकांना आगाऊ सूचना देण्यात आली व सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत आउटेज घेऊन ही नियोजित कामे करण्यात आली. यावेळी समांतर कार्य करण्यात आले आणि देखभाल / दुरुस्तीचे सगळे काम करण्यात आले. झाड ट्रिमिंग, डीओ सेट बदली, पिन इन्सुलेटर बदली, व्ही क्रॉस आर्म बदली, जम्पर तपासणी आणि बदली, एलटी केबल बदली, दोन ठिकाणी आरएमयू स्थापना इ. देखभाल दुरुस्तीसाठी घेतलेल्या क्षेत्रात 51 ट्रान्सफॉर्मर्स आणि सुमारे 10000 ग्राहकांचा समावेश आहे. मात्र शील-मुंब्रा-कळवा भागात वीजपुरवठा सातत्याने अनियमित असल्याने ग्राहकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.