ठामपा आणि भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी
ठाणे
ठाणे महानगर पालिकेच्या सहाय्याने नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक २ मधील इंदिरापाडा-समतानगर परिसरातील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ठाणे महानगरपालिका आणि भारतीय जैन संघटना यांच्या मोबाईल डिस्पेन्सरीच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. त्यानुसार स्थानिक नगरसेवक डुंबरे यांनी महापालिकेशी संपर्क साधून मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन पाठविण्यासाठी विनंती केली होती. त्यानंतर मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅनद्वारे इंदिरा पाडा- समतानगर येथील शेकडो नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यातील संशयास्पद रुग्णांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.