ठाण्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्केहून अधिक
ठाणे:
ठाणे महानगर पालिका क्षेत्रात कोरोना रूग्णवाढीचा वेग काहीसा कमी झाला असून बरे होण्याचे प्रमाणही 70 टक्क्यांच्या वर गेले आहे. त्यामुळे ठाण्यात सद्या दिलासादायक वातावरण आहे. विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 414 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत शहरातील 70.12 टक्के रूग्ण म्हणजे 12929 रुग्णांनी कोरोनावर विजय मिळवला आहे. रुग्णालयात 4910 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 598 रूग्ण मृत्युमुखी पडले आहेत. महापालिकेने आतापर्यंत ७७ हजार २०३ नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली
ठाण्यात २९ जुलै रोजी 288 रुग्णांची भर पडली असून 414 रूग्ण बरे झाले आहेत. नऊ रुग्णांचा मृत्यू झाला. आज सर्वाधिक 58 रूग्ण मानपाडा-माजिवडा प्रभाग समितीमध्ये मिळाले आहेत. नौपाडा-कोपरी प्रभाग समितीमध्ये 43 रूग्ण मिळाले. लोकमान्य-सावरकरनगर आणि कळवा प्रभाग समिती येथे प्रत्येकी 39 रूग्ण सापडले आहेत. उथळसर प्रभाग समितीमध्ये 37 रुग्णांची नोंद झाली आहे. 31 रूग्ण वर्तकनगर प्रभाग समितीमध्ये मिळाले आहेत. दिवा प्रभाग समितीमध्ये २२ तर सर्वात कमी आठ रूग्ण वागळे आणि मुंब्रा येथे पाच मिळाले आहेत.