ठाणे शहरातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे जोडाव्या

ठाणे शहरातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडण्यात याव्यात. 


  भाजपा युवा मोर्चाची शासन व महापालिकेकडे मागणी

ठाणे

ठाण्यातील सर्व रक्तपेढ्या ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडण्यात याव्यात अशी मागणी  भाजपा युवा मोर्चाने केली आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे यामुळे कोरोनाबाधित रुग्णाला किंवा इतर आजारातील रुग्णांना रक्ताची गरज पडल्यास नागरिकांना रक्त संकलन करण्यासाठी रक्तपेढ्यांमध्ये फिरावे लागते काही रक्त पिढ्यांमध्ये आवश्यक असलेले रक्त उपलब्ध नसल्याने नागरिकांना रक्तासाठी इतरत्र वणवण फिरावे लागते आणि रक्त उपलब्ध न झाल्याने देखील काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागत आहे त्यामुळे ज्याप्रमाणे शहरातील सर्व मेडिकल ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडले गेले आहेत. त्यामुळे एखादे औषध मेडिकलमध्ये मिळाले नाहीतर ते कुठल्या मेडिकलमध्ये उपलब्ध आहे ते आपल्याला कळते त्याच प्रमाणे ठाणे शहरातील सर्व रक्तपेढया ऑनलाईन नेटवर्किंगद्वारे एकमेकांना जोडण्यात याव्यात अशी मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे युवा नेते सचिन रावराणे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,आरोग्यमंत्री राजेश टोपे व महापालिका आयुक्त डॉ बिपीन शर्मा यांना केली आहे.