अग्रीमा जोशुआ ला ताबडतोप अटक करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या मुजोर कॉमेडियन अग्रीमा जोशुआ ला ताबडतोप अटक करण्याची आमदार प्रताप सरनाईक यांची मागणी


ठाणे


" alt="" aria-hidden="true" />छत्रपती शिवाजी महाराज हें केवळ एक महापुरुष नसून ते महाराष्ट्राचे आराध्य दैवतं आहेत. लाखो करोडो लोकांचे श्रद्धास्थान असणारे महाराज आजही ३५० वर्षान नंतर सुद्धा प्रत्येक माणसाच्या शरीरात शक्तीच्या रूपात वावर करतायत. शिवरायांचे नावं ओठांवर आले तरी अंगात १०० हातींचें बळ आल्याशिवाय राहत नाही.


कोणी कुठली फालतु कॉमेडियन अग्रीमा जोशुआ येते आणि आपल्या महाराजांचा अवमान करते. इतकी यांची हिंमत होतेच कशी ? अश्या लोकांन मुळे महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या भावनांचा स्फोट होऊन कायद्या सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. महाराजांचा अवमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. त्यामुळे आपण ताबडतोप अग्रीमा जोशुआ नावाच्या विकृत बुद्धीच्या या कॉमेडियन ला अटक करून कडक कायदेशीर कारवाई करावी आणि तिचा शो ताबडतोप बंद पाडावा.


मी देखील कॉमेडी विथ कपील असेल, चला हवा येऊ द्या असेल असे अनेक हास्यविनोद करणारे शो पाहतो. कलाकारांचा आणि त्यांच्या विनोद बुद्धीचा आदर करतो. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांवर विनोद करून कोणी स्वतःचे दुकान चालवायचा प्रयत्न करत असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. जे लोकं कलेच्या नावाखाली माझ्या महाराजांचा अवमान करत असतील असें कलाकार आम्हाला अजिबात मान्य नाहीत. उलट हें कलाकार नसुन समाजकंठक आहेत.


आमच्या शिवसेनेच्या महिला आघाडी व युवती सेनेच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा अग्रीमा जोशुआ मिळेल तिथे तिचे थोबाड फोडणार असा संताप माझ्याकडे व्यक्त केला आणि एक शिवप्रेमी या नात्याने मी देखील त्यांच्या भावांना समझू शकतो.


 त्यामुळे लोकभावनेचा आदर करत आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना या विषयांची अत्यंत गंभीर दखल घेऊन असल्या विकृत बुद्धीच्या लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.