दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही वीजमाफी द्या - ठाण्यात आंदोलन

दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही वीजमाफी द्या - प्रहार संघटनेचे ठाण्यात आंदोलन



ठाणे


दिल्ली सरकारने ज्या पद्धतीने वीजबिल माफी दिलेली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही वीज बिल माफी देण्यात यावी, अशी मागणी करीत प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात आंदोलन केले. ठाणे जिल्हा प्रहार जनशक्ती पक्षाची मुख्यमंत्रान कडे संपूर्ण विजबिल माफीची मागणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जनतेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दिल्ली सरकारच्या निर्णयाला अनुसरुन घरगुती वीज बिल माफ करण्याचे मागणीचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.तसेच, ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत द.गायकवाड,  प्रहार जनशक्ती रिक्षा टृक्सी युनियन अध्यक्ष दयानंद गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सोशल डिस्टन्सींग ठेऊन निदर्शनेही करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनानुसार, लोकमान्य नगर भागात ठेकेदाराकडून रिडींग नोंदविण्यासाठी माणसे पाठविण्यात येतात. मात्र, रिडींग शून्य दाखवून सलग 6 -6 महिने बिले पाठविली जातात. त्यानंतर अचानक हजारो रुपयांची बिले पाठविली जातात. या संदर्भात विचारणा केल्यास अधिकार्‍यांकडून ठेकेदाराचीच बाजू घेण्यात येत असते. तसेच, लॉकडाऊनच्या काळात राज्यभर अव्वाच्या सव्वा वीजबिले पाठविण्यात आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे लोकांकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत. अशा वेळी ते ही बिले कशी भरणार. त्यामुळे दिल्ली प्रमाणेच महाराष्ट्रातही बिले माफ करावीत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.    सदर प्रंसगी  लोकमान्य नगर स्वारकर नगर विभाग अध्यक्ष विशाल चौहान जिल्हा उपाध्यक्ष मुकेश चपलोत, जिल्हा सचिव मनोज जैन, ठाणे शहर अध्यक्ष महैंद्र कोठारी , रिक्षा टृक्सी युनियन उपाध्यक्ष नौशाद मनसुरी , उपस्थित होते