ठाण्यातील काशिश पार्क येथे शिवसेनेच्या वतीने मोफत कोविड चाचणी शिबिराचे आयोजन

  ठाण्यातील काशिश पार्क येथे शिवसेनेच्या वतीने मोफत कोविड चाचणी शिबिराचे आयोजन

ठाणे


ठाणे मनपा क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के  यांच्या संकल्पनेतून व नगरसेवक विकास रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले- जाधव यांच्या वतीने ठाणे महापालिका प्रभाग क्र. १९च्या नागरिकांसाठी  “मिशन झिरो” मोहिमेअंतर्गत मोफत कोविड चाचणी ( स्वॅब टेस्ट) शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना प्रभाग क्र १९ व सबर्बन डायग्नोस्टिक सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील काशिश पार्क येथे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला.यामध्ये केशरी व पिवळ्या रेशन कार्ड धारकांची मोफत तपासणी करण्यात आली तसेच घरकाम करणाऱ्या महिला,सफाई कर्मचारी व इमारतीचे वाचमन यांची देखील मोफत कोविड चाचणी करण्यात आली .कोरोनाची साकळी तोडण्यासाठी प्रभागात विविध ठिकाणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे  यामध्ये सोमवार २७ जुलै रोजी ठामपा शाळा क्र-१८ परबवाडी, मंगळवार २८ जुलै रोजी रघुनाथ नगर शाखा येथे सकाळी १० ते २ यादरम्यान सदर शिबिरांचे आयोजन केले आहे . तरी ज्या व्यक्तीस सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशी कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास तातडीने त्यांनी विनामूल्य चाचणी करून घ्यावी व आम्हांस कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सहकार्य करावे असे आव्हान स्थानिक नगरसेवक विकास कृष्णा रेपाळे व वृक्षप्राधिकरण समिती सदस्य नम्रता भोसले-जाधव यांनी केले आहे.