मनसेकडून महिला रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

 मनसेकडून महिला रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

 


 

ठाणे

 

लॉकडाऊन मुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. तर गेले तीन चार महिने रिक्षा रस्त्यावर धावत नसल्याने महिला रिक्षाचालकांवरही उपासमारीची पाळी आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे/ पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या कानावर ही समस्या आल्या नंतर त्यांनी तातडीने ठाणे आणि मुलुंड येथील महिला रिक्षाचालक बहिणींसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. 

देशामध्ये 22 मार्चपासून लॉकडाऊन झाल्याने सर्वच रोजंदारी करणाऱ्या व्यक्तींवर उपासमारीची वेळ आली आहे. ठाणे व मुलुंड येथील महिला रिक्षाचालकांना घर कसे चालवावे, घराचा हप्ता कसा भरावा, कर्जाचा हप्ता कसा भरावा, खाण्यापिण्याची व्यवस्था कशी करावी, औषध उपचार कसा करावा, मुलांची शिक्षणाची फी कशी भरावी अशा असंख्य समस्या उभ्या राहिल्या आहेत. यातच एका रिक्षाचालक महिलेने तिच्याबाबतीत असलेली समस्या सोशल मीडियावर व्हिडिओ स्वरूपात मांडली.  काही जणांनी त्या महिलेला मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना भेटून समस्या सांगण्याची कल्पना दिली. त्यानंतर या महिलेने अविनाश जाधव यांना फोन केला आणि भेटण्याची इच्छा व्यक्त केली. अविनाश जाधव यांनी त्यांना वेळ देऊन त्यांच्या सोबत असणाऱ्या इतरही महिलांना कशाप्रकारे अडचणी येत आहेत हे समजून घेतले. त्यानंतर ठाणे, मुलुंड मधील 50 महिला रिक्षाचालकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

 विशेष म्हणजे या महिलांनी काही बँकांमधून कर्ज घेतले आहे. सध्या कर्जाचे हप्ते परतफेड करण्यासाठी बँकेचे कर्मचारी सतत तगादा लावत आहेत.  ही समस्या अविनाश जाधव यांच्या कानावर घातल्यानंतर हाही प्रश्न मनसे स्टाईल मार्गी लावण्यात यश मिळाले. रिक्षा रस्त्यावर काढली तर रिक्षा चालवायला परवानगी नसल्याने पाचशे रुपये दंड आकारला जात होता.  या विषयाची दखल घेत अविनाश जाधव यांनी ही समस्या राज ठाकरे यांच्या कानावर घातली आणि ठाकरे यांनी त्वरित महिलांना रिक्षा चालवण्यासाठी परवानगी काढून दिली. या प्रकारच्या केलेल्या सहकार्याचे या महिलांनी खूप कौतुक केले आहे.