लाॅकडाऊन काळात ५ लक्षपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण

लाॅकडाऊन काळातील १२ दिवसांत महापालिकेने केले मोबाईल ॲपच्या माध्यमातून  लक्षपेक्षा जास्त लोकांचे सर्वेक्षण


ठाणे


महापालिकेने लाॅक डाऊन जाहिर केल्यानंतर केवळ १२ दिवसांत जवळपास ५ लाखांपेक्षा जास्त लोकांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण मोबाईल ॲपच्या माध्यमातून करण्यात आले आहे.


महापालिकेच्यावतीने २ जुलै रोजी लाॅकडाऊन जाहिर केल्यानंतर महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार सर्वेलन्सची रियल टाईम आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी मोबाईल ॲपच्यामाध्यमातून सर्वेलन्स करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सिम्प्टो या मोबाईल ॲपच्या माध्यमातून सर्वेलन्स करण्याचा निर्णय घेण्यात आला.


यासाठी प्रभाग समितीनिहाय आवश्यक ती पथके तयार करून त्यांना मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरोघरी जावून कसे सर्वेक्षण करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानुसार प्रभाग समितीनिहाय पथकांनी घरोघरी जावून गेल्या १२ दिवसांत जवळपास ५ लक्ष, ३ हजार, ७७५ इतक्या लोकांचे सर्वेक्षण केले आहे.